बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (15:52 IST)

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

murder
औरंगाबाद : मिळालेल्या माहितीनुसार,औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून कॉलेजसमोरून तरुणीस ओढत नेत हत्या केल्याची शहराला हादरवणारी घटना घडली. मृत तरुणी ही 19 वर्षीय विद्यार्थींनी आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ घटना घडली आहे. दुपारी तरुणी महाविद्यालयाबाहेर आली असता एक तरुण तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणीस कॉलेजसमोरून 200 फुट ओढत नेत तरुणाने तिला चाकूने भोसकले. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे.