शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जय सापडला, महाराष्ट्र सोडून गेला तेलांगनात

होय जय सापडला आहे. तो निघून गेला होता. तो आता तेलंगणा येथे आहे अशी महिती समोर येतेय. जय म्हणजे महाराष्ट्राचा मोठा वाघ महाराष्ट्राची शान ज्याचे अनेक वर्ष जंगलावर हुकुमत आहे तो रुबदार जय. राज्याची उपराजधानी नागगपुरातून बेपत्ता झालेला ‘जय’ वाघ सापडल्याचा दावा तेलंगणा सरकारनं केला आहे. एप्रिल महिन्यापासून जय बेपत्ता आहे. तेलंगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांनीही दुजोरा दिला आहे.
 
 बेपत्ता असलेला वाघ हा पूर्ण  आशियातील सर्वात मोठा वाघ आहे आणि निष्काळजीपणामुळे  तो  ‘जय’ बेपत्ता होता. त्याचा शोधही बरेच दिवस सुरु होता. अखेर आज जय वाघ तेलंगणामध्ये दिसल्याचं वृत्त तेथील एखा स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलं. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलांगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. जुगारामण्णा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.मात्र थोडे पुरावे आणि इतर गोष्टी भेटल्या की सरकार अधिकृत घोषणा करणार आहे.