शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (10:34 IST)

नारायण राणे यांनी ती गोष्ट आत्मचरित्रात लिहायला नको होती

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला आहे. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते, यावेळी काँग्रेसची निवड कशी केली आणि ती योग्य ठरली का, याबाबत पुस्तकात त्यांनी लिहायला नको होतं, असं शरद पवार  यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
 
जेव्हा राणे शिवसेनेतून बाहेर निघाले तेव्हा कोणत्या पक्षात त्यांनी जावे हा मोठा प्रश्न होता, तर काँग्रेसमध्ये जाऊ की राष्ट्रवादीमध्ये असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आले. हे कोणाला माहित नाही. तेव्हा शेवटी राणे यांनी चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली आणि ती काँग्रेसच्या नावाची निघाली तेव्हा  आता ही चूक होती की घोडचूक यावर मी काही बोलणार नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.