रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (15:56 IST)

नारायण राणे आत्मचरीत्र लिहित आहेत

“माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. आता राणे आत्मचरीत्रात कोणते गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नारायण राणे यांनी युतीचे सरकार असताना मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आघाडीची सत्ता असताना त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.