नाशिक: परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार; तपास क्राईम ब्रांचकडे..  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  नाशिक: नाशिक विभागासह राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप याच विभागातील एका मोटार वाहन निरीक्षकाने केला आहे. त्यावरुन पंचवटी पोलिसांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारावर चौकशी सुरू केली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	आरटीओ विभागातील (प्रादेशिक परिवहन) निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री परब यांच्यासह ६ बड्या अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार पंचवटी पोलिसांत केली होती. गजेंद्र पाटील हे नाशिकला मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहूनच ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
				  				  
	 
	गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि विभागीय कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, मुंबईतील परमबिरसिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून अत्यंत सावधगिरीने हे प्रकरण हाताळले जात आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	या प्रकरणामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याप्रकरणाची पुढील ५ दिवसांत चौकशी करुन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हे या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.