धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

nawab malik
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे निवडणुका होत आहेत. भाजप साम-दंड-भेदाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक
यांनी केला.

भंडारा-गोंदिया येथे आचारसंहिता सुरू असताना धानावर पडलेल्या तुडतुडा रोगाची आर्थिक मदत मंजूर करून भाजप शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवत आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारी निधी वाटता येत नाही. त्यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केला असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. भाजपला सरळ मार्गाने निवडणुका जिंकता येत नाही त्यामुळे हे कृत्य केले जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असल्याची बतावणी मलिक यांनी केली. तसेच याप्रकारचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने तोबडतोब कारवाई करायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड- भेदचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. त्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री थेट धमकी देत हल्ला करा असे म्हणत आहेत. धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा. पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावे. गरज असेल तर फॉरेन्सिक लॅबमध्ये ही क्लिप पाठवून छाननी करावी अशी मागणी करत, शिवसेनेने जनतेत जाऊन नुसती पुंगी वाजवू नये, हिम्मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असे आव्हानही मलिक यांनी केले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490
महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या आता 490 वर पोहचली ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन
तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी याने मुसलमानांना विभाजित करण्यासाठी ...

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार
दिल्लीमध्ये मुलाने आपल्या वडिलांविरूद्ध लॉकडाऊनचं उल्लंघन करत असल्यामुळे एफआयआर दाखल केली ...

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड
येत्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करून साधा दिवा किंवा टॉर्च ...