मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (14:57 IST)

बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍या अटक

NCP Youth Congress office bearers arrested in rape case in Panvel
पनेवल शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात तरुणीवर बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
29 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला गेला आहे. यानंतर मंगळवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. शहबाज पटेल यांच्या ओळखीच्या तरुणीने ही तक्रार दिली आहे. शहबाज यांनी लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचे तरुणीने म्हटले आहे. त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला असताना त्यांनी आपल्याला जातिवाचक शिवगाळ झाल्याचाही आरोप तरुणीने केला आहे.
 
पटेल कुटुंबीयांकडून या आरोपाचे खंडन केले जात आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पटेल यांना पदावरुन निलंबन करण्यात आले आहे.