सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 1 जून 2021 (19:12 IST)

कोवीड च्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे नवे दर जाहीर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

New rates for private hospitals for Kovid treatment announced - Chief Minister Uddhav Thackeray
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरला आहे.या आजाराचा मार सर्वसामान्य तसेच ग्रामीण भागात बसला आहे. 
कोरोना बाधितांवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आकारले  जाणारे अवाच्या सव्वा बिलांवर आळा घालण्यासाठी आणि सर्व सामान्य लोकांना दिलासा मिळावा या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयात केले जाणारे उपचारांची दरे निश्चित करण्यात आली.
 त्यांनी आज या अधिसूचनेला मंजुरी दिली असून या मुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.यानुसार शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहे.या अधिसूचने अंतर्गत निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाही.या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि या बाबत सर्व सूचना संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकायुक्तांना देण्यात यावेत असे मुख्यमंत्री म्हणाले.   
खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे
या संदर्भात आरोग्यमंत्री म्हणाले की या पूर्वी दर कमी करावे या बाबत अनेक निवेदन माझ्याकडे व माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे आले होते.त्याबाबत उपमुख्यमंत्रांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याशी झालेल्या चर्चे वरून गाव आणि शहरांचे वर्गीकरण करून दरांमध्ये बदल करण्याचे निश्चित केले.आणि हा प्रस्ताव पुढे मुख्यमंत्रांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.
 
या वर्गीकरणामुळे शहरांना मोठा दिलासा मिळेल असे ही ते म्हणाले.
कोरोनाचा उपचारासाठी शहरांच्या दर्जेनुसार वर्गीकरण केले आहेत.अ,ब,क या गटा प्रमाणे शहरांची आणि ग्रामीण भागांची विभागणी केली आहे.
अ वर्ग शहरांसाठी 4 हजार रुपये,ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रुपये,आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये दर निश्चित केले आहे. या मध्ये रुग्णाची देखरेख,नर्सिंग,चाचण्या,औषधे,बेड्सचा खर्च, जेवण,याचे समावेश आहे. 
तसेच व्हेंटिलेटर साठी अ वर्गासाठी 9 हजार रुपये,ब वर्गासाठी 
 6700 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी  5400 रुपये दर निश्चित केले आहे. 
आयसीयू आणि विलगीकरण साठी अ वर्ग शहरांसाठी 7500 रुपये,ब वर्ग शहरांसाठी 5500 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रुपये दर निश्चित केले आहे.
 असं केल्याने शहरी आणि ग्रामीण भागात उपचारांचे दर वेगवेगळे असतील त्यामुळे ग्रामीण भागात उपचार कमी खर्चात होतील.सामान्य जनतेला या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. 
या अधिसूचनेनुसार कोणत्याही रुग्णालयाने निश्चित दरांपेक्षा जास्त दर आकारले तर त्याच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद देखील या अधिसूचनेत दिली आहे.अशी माहिती राज्य आरोग्य हमी अधिकारी यांनी दिली.
अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र (भिवंडी , वसई-विरार वगळून),  पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी),
ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली हे शहरे येणार. 
क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांना समाविष्ट करण्यात आले आहे