गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (09:44 IST)

मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढे ६ ऑगस्टपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार आहे. दरम्यान, ४ ते ५ ऑगस्टदरम्यान मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. दरम्यान, मुंबईतील सखल भागात यामुळे पाणी साचण्याची शक्यता असून याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशाराही हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. 
 
४ ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईसह मध्य महाराष्ट्रात घाट परिसरासह कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.