गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (18:20 IST)

निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ

Nilesh Lanke
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला आणि संसदेत खासदार म्हणून गेले. काल 24 जून रोजी त्यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्रातील इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. शपथ घेतल्यावर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्णहरी असे म्हटले. निलेश लंके यांच्या इंग्रजीतून शपथ घेतल्याची चर्चा राज्यभरात होत आहे. 

अहमदनगर मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटातील निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान सुजाय विखे आणि लंके यांच्यात शाब्दिक युद्ध झाले. सुजाय यांनी निलेश यांना इंग्रजी भाषेवरून टोला लगावला ते म्हणाले, जेवढी इंग्रजी मी बोलतो तेवढी जरी इंग्रजी समोरच्या उमेदवारांनी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.

सुजाय यांच्या आव्हाहनाला निलेश लंके यांनी स्वीकारले होते. ते म्हणाले, इंग्रजी केवळ एक भाषा आहे.ती शिकायची म्हटल्यास काहीच अवघड नाही. त्यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेत सुजाय विखे पाटीलांना सडेतोड उत्तर दिले आहे. 
 
Edited by - Priya Dixit