मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (15:05 IST)

नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण

Nitesh Rane surrenders in Sindhudurg District Court नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणMarathi Regional News  In Webdunia Marathi
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. तसेच १० दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. 
 
गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी नितेश राणेंच्या वतीने युक्तीवाद केला. तर सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले. तसेच १० दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्यासाठी दाखल झाले आहेत.