Widgets Magazine

2 महिन्यांपूर्वीच बंद झाली होती नोट छपाई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मंगळवारी पाचशे आणि हजार रुपयांच्या केल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये दोन महिन्यांपूर्वीच या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतचा खुलासा नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केला आहे. सोबतच नव्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवी डिझाइन असलेली पाचशेची नोट नाशिक आणि देवास येथील नोट प्रेसमध्ये आणि दोन हजार रुपयांची नोट म्हैसूर आणि सालगोनियाच्या नोट प्रेसमध्ये छपाईचे काम सुरू आहे.
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाबाबत देशात अतिशय गुप्तता बाळगण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच या नोटांच्या छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिल्याचे आता समोर आले आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये आठ दिवस आधी नव्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. नाशिकमध्ये ५०
कोटी नोटांची छपाई होत आहे. तर देशातील इतर प्रेसमध्येही छपाई सुरु असल्याची जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे. सोबतच या निर्णयामुळे कामावर फारसा फरक पडलेला नाही. मात्र, नोटांची मागणी वाढली आणि काम वाढले तरी कामगार रात्रंदिवस अतिरिक्त कामासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले आहेत.


यावर अधिक वाचा :