गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:53 IST)

रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट

Offensive tweet against Rashmi Thackerayरश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट  Marathi Regional News  IN Webdunia Marathi
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या साठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्तव्य केले होते की रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पद व्यवस्थित सांभाळू शकतात. त्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. त्यावर भाजपच्या मीडियाचे पदाधिकारी जितेन गजारिया यांनी या प्रकरणात वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासाठीआक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली होती आणि पोलीस सायबर सेल ने जबाब नोंदविण्यासाठी बोलावून घेतले आहे. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देखील आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून त्यांची तक्रार सायबर सेलला केली होती. त्यासाठी सायबर सेल ने जबाब नोंदविण्यासाठी गजारिया यांना बोलावले आहे. या प्रकरणात ते दोषी आढळल्यावर त्यांना अटक केली  जाण्याची शक्यता आहे.