1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (08:04 IST)

सोलापूर डंपरचा कट लागून चाकाखाली आल्याने दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

boy died on the spot
आजीसोबत दवाखान्यात चालत जात असताना डंपरचा कट लागून चाकाखाली आल्याने दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अजान उस्मान चौधरी (वय दीड वर्षे, मेहताब नगर, शेळगी) असे मयत मुलाचे नाव आहे. हा अपघात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मड्डीवस्ती येथे घडला.
 
मयत अजान हा आपल्या आजी-आजोंबासोबत दवाखान्याला जात होता. तेव्हा मड्डीवस्ती येथे पाठीमागून येणार्या खडीने भरलेल्या डंपरने अजान याला चिरडले. त्यानंतर डंपर चालकाने घटनास्थाळावरून जवळपास पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यानंतर गाडी थांबवली. संतप्त नागरिकांनी दगडफेक करून गाडीचे काच फोडत, रस्ता रोको आंदोलन केले. पोलीसांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, अजानला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor