रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (08:25 IST)

संतापजनक! पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा सामूहिक बलात्कार; ८ जणांना अटक

Minor girl gang-raped by 11 persons in Palghar
गेल्या काही दिवसात मुंबई व आसपासच्या उपनगरांमध्ये मुली आणि महिलांवर बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने संतापाचे वातावरण आहे. तसेच या प्रकारामुळे महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. त्यातच आता एक संतापजनक घटना पालघरमधून समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधमांपैकी ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य ३ आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
 
सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस त्यांचा तपास करत आहेत.
 
माहिम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीवर जबरदस्ती करण्यात आली. पालघरमधील अनेक समुद्र किनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो. एकट्या-दुकट्या व्यक्तीला गाठून लुटण्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत त्यामुळे गस्त वाढवावी, नशेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वीही ग्रामस्थांनी केली होती.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor