पाली : राज्याचे राजकारण गोंधळात टाकणारे- छत्रपती संभाजी राजे
राज्याचे राजकारण गोंधळात टाकणारे आहे. काय चालले आहे हेच कळेनासे झाले आहे. शिवसेना सत्तेत आहे. विरोधातही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे आणि विरोधातही आहे. भाजप मात्र बाजूला राहून मजा बघत आहे. काही गडबड आहे ही गडबड मला समजून घ्यायची आहे. मी राजकारणी नाही, पण राजकारण्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे.
सुसंस्कृत राजकारण करण्याचा माझा प्रयत्न आहे.ते पाली येथे शेकाप वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणी आमदार जयंत पाटील आणि पक्षाचे नेते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सांगली येथील एक गृहस्थ महात्मा गांधी, ज्योतीबा फुले आणि तिरंगा झेंड्याबद्दल काही बोलतो, हा मोठा गुन्हा नाही का असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात आमचा त्यां गृहस्थांचा संबध नाही. ते वेगळ्या संघटनेचे आहेत. कोणाला फसवत आहात. लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, आणि कोणी जर बेजबाबदारपणे वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्ये केली. शेकाप हा कुणा समोर वाकणारा पक्ष नाही, वेळ पडली तर आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदावरही पाणी सोडण्याची या पक्षाची तयारी असते,
75 वर्षाचा विचार त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून मी त्यांच्या सोबत आहे असेही ते यावेळी म्हणाले. आमची उद्दीष्ट वेगळी असली तर विचार एक आहे. या विचारासाठी आपण सोबत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगीतले. वरळी येथील दुध डेअरीसाठी 200 कोटी दिले जाणार असल्याचे मी ऐकले.
दुध डेअरीसाठी निधी द्याच पण राज्याचा इतिहास असलेल्या गडकोट किल्ल्यांसाठी निधी कधी देणार असा सवाल त्यांनी यावेळी केला. रायगड किल्ल्याचे संवर्धन माझ्यामुळे सुरु झाले. सरकारनी निधी दिला. त्याच प्रमाणे 50 किल्ले द्या मी संवर्धन करून दाखवतो. याची सुरवात सुधागड किल्ल्यापासून करू या पुर्नउच्चार त्यांनी यावेळी बोलतांना केला.
Edited By - Ratnadeep Ranshoor