मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (17:23 IST)

Panaji :कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

death
पणजीच्या पाटो पणजीतील जुना पेट्रोल पंप परिसरात  शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. मृतदेहातून दुर्गंधी येत असून मृतदेह एका पुरुषाचा आहे.या परिसरात एक मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पणजी पोलिसांना कोणीतरी दिली.

पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करत अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. 

मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस  करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit