Pandharpur Special Trains: कार्तिकी यात्रेसाठी स्पेशल ट्रेन्स धावणार  
					
										
                                       
                  
                  				  यंदा 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकीला पंढरपुरात लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी कार्तिकी यात्रेसाठी वारकरी बंधू राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या इतर भागातून पंढरपुरात पोहोचतात. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. मिळेल त्या वाहनाने भाविक पंढरपुरात दाखल होतात.
				  													
						
																							
									  
	
	आता प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून येत्या 20 ते 27 नोव्हेंबर पर्यंत 35 फेऱ्यांमध्ये मिरज- कुर्डुवाडी, मिरज-पंढरपूर, पंढरपूर- मिरज, मिरज -लातूर  दरम्यान विशेष गाड्या धावणार आहे. 
				  				  
	 
	यंदा पंढरपुरात कार्तिकीला राज्यभरातून आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये या साठी रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या असून येत्या सोमवार 20 तारखे पासून या गाड्या 35 फेऱ्या घेणार आहे. जेणेकरून भाविकांचा प्रवास सुखकर होईल. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
 Edited by - Priya Dixit