बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2017 (20:50 IST)

आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव : पंकजा मुंडे

नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यभरातल्या 8 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात उपसरपंचांची निवड मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून केली जाईल. तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल, असा प्रस्ताव आहे. राज्य मंत्रिमंडळाची येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळवली जाईल आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करुन सप्टेंबर-ऑक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.