1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (09:29 IST)

पंकजा मुंडे यांनी केल शरद पवार यांच कौतुक

Pankaja Munde
पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं ट्विट करत पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत. पवारांच्या कामाचं कौतुक करताना पक्ष आणि विचार वेगळे असतात, असं सांगताना त्यांनी मुंडे साहेबांच्या शिकवणाची पुष्टी जोडली.