1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (15:29 IST)

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

Patient
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज पुरवठा खंडित झाल्याने ओमेशचा मृत्यू झाला. त्याला फुफ्फुसाचा आजार असल्याने गेले वर्षभर घरातच उपचार सुरू होते. थकित वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या अधिकार्‍यांवर करावाई करण्याची मागी नातेवाईकांमधून होत आहे. त्यांनी आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.