शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (08:13 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक नवी वेब सीरिज लाँच

कोरोनामुळे सध्या वेबसीरिजचा जमाना सुरू झाला  आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक नवी वेब सीरिज लाँच केली आहे. 'पेंग्विन गेम्स' या नावाखाली वरळीतील सामान्य नागरिकांना ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागतेय  त्यांनी एका वेब सीरिजला सुरूवात केली आहे. या वेब सीरिजद्वारे मनसेनं सामोरं जावं लागत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
"फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्ष हे केवळ वरवरच्या मुद्द्यांवरच लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे," असं मत मनसेचे संतोष धुरी यांनी व्यक्त केलं.