शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (08:23 IST)

खासगी क्लास, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका उघडण्यास परवानगी

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका 50 टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
 
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोविड 19 सरासरी पॉझिटिव्हीटी दर 5 जून रोजी 5.8 टक्के आणि ऑक्सिजन बेड उपलब्धता 15.91 टक्के होता. महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हीटी दर 5.2 टक्के असून ऑक्सिजन बेड उपलब्धता 10.95 टक्के आहे.
 
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राबाहेरून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कंपनी, कारखाने, बांधकाम स्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी कामासाठी येणाऱ्या कामगार व इतर व्यक्तीची निर्बंध हटविल्यानंतर कामावर रुजू होताना रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक राहील. स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग सेंटर्स, अभ्यासिका उघडण्यास 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.