रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:33 IST)

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, पोलीस जखमी

मुंबईतील कल्याण जवळील आंबिवलीमधील इराणी वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. 
 
या घटनेमध्ये इराणी वस्तीत एक सराईत गुन्हेगार पडकण्यासाठी हे पोलिसांचे पथक आले होते. या पथकाने संबंधित व्यक्तीला पकडले आणि गाडीत बसवून नेत होते. नेमक्या त्याच वेळेला रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांच्या दोन्ही गाड्या तिकडे अडकून पडल्या. आणि हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केली. तर काही जणांनी बांबूच्या सहाय्याने गाड्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही काळ पोलिसही बिथरून गेले  तर दोन गाड्यांपैकी एक गाडी कशीबशी तिथून दुसऱ्या मार्गाने निघून गेली.  ज्या गाडीमध्ये या आरोपीला ठेवण्यात आले होते तिच या लोकांच्या तावडीत सापडली. ज्यातून या इराण्यांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या तावडीतून खेचून बाहेर काढले आणि तिथून धूम ठोकली. याबाबत  कल्याणच्या खडपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.