1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे पाणी प्रश्न, पोस्टरबाजी गिरीश काय रे ? अजित ने कधी पाणी कमी पडू दिले नाही

poster war in pune on water
पुणे म्हटले की अपमान करणाऱ्या आणि अनोख्या सोबत मुद्दा अगदी स्पष्ट करणाऱ्या पाट्या. त्यात आज काल तर अनेक ठिकाणी आता तर पोस्टर लागत असून त्यामुळे मनोरंजन आणि उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. असाच प्रकार पुन्हा घडला असून यावेळी पोस्टर मधून गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून भन्नाट प्लेक्सबाजी नागरिकांना पाहायला मिळते आहे. यामध्ये कधी शिवडे.. आय एम सॉरी.. तर कधी आपण यांना पाहिलत कां.? , ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या... यांसारख्या मजकुरांच्या बॅनरने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर दणाणून सोडला.
 
 पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला या गिरीश काय रे.?, दुष्काळ असताना सुध्दा अजितने कधी शहराला पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना ! मग पाणी कुढे मुरते आहे ! अशा मजकुराच्या बॅनरमधून लक्ष्य करण्यात आले आहे. 
 
शहराच्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी झाडू लागल्या आहेत. विरोधी पक्षांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार टीका सुरु आहे. त्यात ’खासगी ’त विरोधक टीका करत आहे असे  बोलले जात आहे. मात्र, या प्लेक्स खाली एक त्रस्त पुणेकर असा उल्लेख आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे.