शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:11 IST)

पुढील काही दिवसांत प्रताप सरनाईकांना अटक होईल : सोमय्या

Pratap Sarnaik will be arrested in next few days: Somaiya पुढील काही दिवसांत प्रताप सरनाईकांना अटक होईल : सोमय्याMaharashtra Regional News In Webdunia Marathi
शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.  यावर बोलत असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुढील काही दिवसांत प्रताप सरनाईकांना अटक होईल असे सांगितले आहे.
 
एका वृत्तवाहिनी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘२०१३मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडचा घोटाळा झाला होता. त्यानंतर कारवाई सुरू झाली. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर आस्था बिल्डर पाच हजार सहाशे कोटींपैकी २१६ कोटींची चोरी केली होती. मग त्यातील ३५ कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्याकडे आले. त्यानंतर सरनाईक यांनी टिटवाळा येथे ७८ कोटींची जमीन घेतली. ती जमीन पण ईडीने काही दिवसांपूर्वी जप्त केली. आता ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. पुढे प्रताप सरनाईकांना अटक होणार आहे.’
 
पुढे सोमय्या म्हणाले की, ‘ईडीच्या या कारवाईनंतर दुसऱ्यापण उद्योग धंद्यांवर कारवाई होणार आहे. एमएमआरडीचा ५०० कोटींचा जो सिक्युरिटी घोटाळा झालाय, त्याच्यावरही कारवाई होणार आहे. उद्धव ठाकरेंनी जरी पोलिसांना सांगितलं असेल निर्दोष आहे, घोषित करा. पण कोर्ट आणि ईडी त्या घोटाळ्यात पण प्रताप सरनाईकला सोडणार नाही.’