1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (16:53 IST)

पुस्तकी तुला करताना पडले प्रतापराव जाधव, सुदैवाने दुखापत नाही

Prataprao Jadhav fell off the scales
social media
बुलढाण्यात शिवसेने शिंदे गटाचे खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांची पुस्तकी तुला करण्यात आली. या वेळी तुलेची दोरी तुटली आणि ते खाली पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.  
 
बुलढाण्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार आणि प्रथमच मंत्री झालेले प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या साठी खामगाव येथे शासकीय अतिथिगृहाच्या बाहेर काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात त्यांच्या वजनाचे पुस्तक तुला करायचे देखील कार्यक्रम होते. या पुस्तकी तुला मध्ये गरीब मुलांना वह्या वाटप करण्यात येणार होते.

मंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमासाठी आले होते. तिथे त्यांची पुस्तकी तुला करण्यात आली. ते तुला मध्ये बसले मात्र तुलाची दोरी तुटल्याने ते खाली पडले. ते पडतातच त्यांच्या समर्थकांनी तात्काळ धाव घेत त्यांना हात धरून उचलले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. नंतर ते उठले आणि पुन्हा तुलात बसले. आणि त्यांची पुस्तकी तुला करण्यात आली.   
 
Edited by - Priya Dixit