तयारी गणेश उत्सवाची, तब्बल दोन हजार दोनशे जादा बस सोडणार  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घरात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल दोन हजार दोनशे जादा बसेसची सोय केली आहे. येत्या २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी करता येणार आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) 20 जुलै पासून सुरुवात होत आहे. संबंधित लोकांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
				  													
						
																							
									  
	 
	२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच  ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा  बसेसची सोय करण्यात आली  आहे.