गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:56 IST)

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाचे दागिने भामट्याने केले लंपास

Pretending to be a policeman
चिपळूण शहरातील प्रांत ऑफिस समोर राहणारे दिवाकर गोविंद नेने (वय-७५) यांची दोन अज्ञात तोतया पोलीसांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी चोरून हे दोघे पसार झाले आहेत. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी रत्नागिरी परिसरातही असाच प्रकार आढळून आला होता. रत्नागिरी पाठोपाठ आता चिपळूणात असा प्रकार घडला आहे.
 
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवाकर नेने हे घरा जवळच असलेल्या थोटे डेअरी जवळ दूध आणण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमानी त्यांना ओ काका म्हणून हाक मारली आणि बोलावून घेतले. आपण पोलीस आहोत अस सांगत असताना कोरोनाचे कारण सांगून त्यांना मास्क घालण्यास तोतया पोलीसांनी सांगितले. तसेच मोबाईल ,घड्याळ,सोन्याचे दागिने रुमालात बांधून खिशात ठेवा पुढे चोऱ्या होत आहेत अशीही बतावणी केली. यानुसार दिवाकर नेने यांनी दागिने रूमालात गुंडाळून तो रूमाल खिशात ठेवला. त्यानंतर फिर्यादी हे दूध आणावयास गेले, तेव्हा फिर्यादीयांनी स्वतःकडे असणारा रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये मोबाईल घड्याळ व पेपरच्या पुडीमध्ये दोन दगड आढळून आले. या अज्ञात भामट्यांनी हात चलाखी करत दागिने चोरल्याचे लक्षात येताच दिवाकर नेने यांनी चिपळूण पोलीस स्टेशनकडे धाव घेत फिर्याद नोंद केली. याचा अधिक तपास चिपळून पोलीस करत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor