1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कर्जमाफी, दुष्काळ मदत फक्त गाजर, स्वभिमानीचे मराठवाड्यात आंदोलन

protest in marathwada
कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांची घोर फसवणूक झाली असून आताही दुष्काळाचं गाज दाखवलं जात आहे. सरसकट सबंध जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याऐवजी मंडलनिहाय जाहीर केला जात आहे याचा निषेध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 
 
शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन यांनी केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, खरीप पीक विमा १०० टक्के मंजूर करुन तात्काळ द्यावा, तुरीला २५ टक्के पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी, दावणीला चारा द्यावा, कृष्णा खोर्‍याचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला तात्काळ द्यावे, शेतकर्‍यांचे वीज बील आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे साखरेचे दर किमान ३५०० रुपये निर्धारित करावेत आदी मागण्या या मोर्चाने केल्या आहेत. मोर्चात सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, अ‍ॅड. विजय जाधव, धर्मराज पाटील, महारुद्र चौंड, माणिक कदम, गणेश माडजे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, रमाकांत मोरे यांचा सहभाग होता.