गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2017 (14:16 IST)

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.गेल्या दहा दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. 1 जुलै ते 11 जुलैदरम्यान पाऊसच न झाल्याने राज्यातल्या 12 जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलं आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीनं ही परिस्थिती प्रतिकूल ठरणार आहे. मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये 35 टक्के आणि ऑगस्टमध्ये 35 टक्के पाऊस पडतो. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने मारलेल्या दडीनं जुलैमधला टक्का कमालीचा घसरला आहे. मात्र आताच्या हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजाला दिलासा मिळाला आहे.