गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (22:54 IST)

Rain In Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती संकटात

Rain News : सध्या तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन  राज्यात  अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणच्या भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंचेच्या सापडला आहे. शेतीवर संकटाचे सावट आहे. सध्या भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसा ने हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 
 
सध्या भातशेतीला पावसाचा फटका बसत आहे. मध्य महाराष्ट्र ,कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, 
तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गात रात्री पासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे भातशेतीवर धोक्याचे सावट आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit