मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:04 IST)

राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत

Raj Bhavan
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास विलंब लावणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा लक्ष्य केले आहे.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाय खेचण्याचे काम सुरु आहे. राज्यपाल यांनी येथून बदनाम होऊन जाऊ नये. १२ दिवस उलटूनही फाईलवर का सही केली जात नाही? ती काय भ्रष्टाचाराची फाईल आहे का? राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये. तसंच इतरही काही अड्डे आहेत, तिथे त्यांनी पत्ते पिसत बसावेत.
राऊत यांनी भाजपवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, २८ तारखेनंतरही मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच राहतील. विरोधी पक्षाचा जो जळफळाट सुरु आहे. त्यात तेच जळून खाक होतील. अशा संकटात एकत्र येऊन काम करायला हवे. परंतु यांना मात्र राजकारण सुचत आहे.