मनसेचा झेंडा बदलणार !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपला झेंडा बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सोशल मिडिया तसेच अनेक प्रसारमाध्यमांद्वारे ही बातमी बाहेर आली असली तरी यासंदर्भात मनसेकडून कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही.
माहितीनुसार २३ जानेवारी रोजी राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहे. या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते.
नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे.