गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (22:10 IST)

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या निर्णयानंतर पुन्हा राज ठाकरे यांचे फडणवीसांना पत्र..

raj thackeray
मुंबई  – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे.  यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. आता भाजपने घोषणा करताच राज यांनी पुन्हा नवे पत्र फडणवीस यांना लिहिले आहे.
 
राज यांनी या पत्रात म्हटले आहे की, अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल फडणवीस आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा!, असे नमूद केले आहे.
 
ठाकरे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, ठाकरे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  चांगली सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न मनसे म्हणन आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनश्च आभार, असे राज यांनी नमूद केले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor