1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (09:31 IST)

राज यांचा ठाकरे यांचा ठाकरी ‘दणका’, टोलनाक्यावरील सर्व वाहने सोडली!

Raj Thackeray
खालापूर : पिंपरीमधील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रागा लागल्या असल्याने अडकले. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही होती. टोलनाक्यावर वाहनांची रांग यलो लाइनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडली जावीत, असा नियम आहे. मात्र आज खालापूर टोलनाक्यावर वाहनांची भलीमोठी रांग लागल्यानंतरही टोलवसुली सुरूच होती. त्यामुळे राज ठाकरे हे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या.
 
यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा, असं राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिका-याला बजावलं. राज ठाकरे यांनीच पुढाकार घेऊन टोलनाक्यावरील वाहने सोडल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

Edited By- Ratnadeep Ranshoor