मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (17:08 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

NCP MP Srinivas Patil wife
राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार श्रीनिवास पाटील  यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचं पती श्रीनिवास पाटील, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.  

त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास कराड येथे वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार. 

त्यांचा जन्म 26 जुलै 1948 रोजी सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे झाला. त्यांचा विवाह 16 मे 1968 रोजी खास. श्रीनिवास पाटील यांच्याशी झाला. त्यांना 'माई' या नावं ओळखायचे. त्यांनी उच्चशिक्षण घेतले असून जुन्या रूढी, परंपरा , संस्कृती जोपासली. 

त्यां प्रेमळ स्वभावाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी  न्हवती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. 

 Edited by - Priya Dixit