रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचं राणे यांचे संकेत

भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या ५६ पैकी ३५ आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अकार्यक्षम आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावा राणे यांनी केला आहे.
 
एका कार्यक्रमानिमित्त नारायण राणे ठाण्यामध्ये आले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नारायण राणे म्हणाले, “सरकार कसं चालवायचं हेच त्यांना माहिती नाही. त्यामुळे अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाच आठवडे घेतले. त्यामुळे ते सरकार कसं चालवणार हे दिसून येतं,” असं राणे म्हणाले.