मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (16:26 IST)

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

rao saheb danve
लक्ष्मीदर्शनसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पैठणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.“मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी 17 नोव्हेंबर रोजी पैठणमधील प्रचारसभेत केले  होते.  दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र  त्यांच्या उत्तराने निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही. त्यानंतर निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनागुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले .