मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अन्यथा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज: दानवे

स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज: रावसाहेब दानवे
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीवरून धुसफूस सुरु असतानाच युती झाली तर ठीक अन्यथा भाजप स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने बदललेल्या परिस्थितीनुसार जागा मागितल्या असल्याचे त्यांनी म्हटले.
 
युतीच्या चर्चेत कोणताही अडसर येऊ नये यासाठी आम्ही डेडलाइन दिली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सोयीने चर्चा सुरू असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राजकारणात कोणी कोणाची वाट पाहत नाही. वाट पाहत बसलो तर फसवेगिरीचा प्रकार होतो, असा सूचक इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला.
 
राज्यात युतीसाठी सर्व पर्याय खुले असून त्याचे अधिकार स्थानिक पदाधिकार्‍यांना दिले असल्याचे दानवे यांनी सांगितले.