गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:53 IST)

वाचा, राज्य मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वाचे ६ निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १२ जलसंपदा प्रकल्पांना ११४ कोटी रुपयांऐवजी ६२४ कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. अल्पसंख्यांक विभागात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे ६ निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले ६ निर्णय असे 
अल्पसंख्यांक विकास
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
क्रीडा
विभागीय व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुल बांधकाम योजनेचे अनुदान वाढवले
विधि व न्याय
मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर मंगरूळपीर ही दोन न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करून पदनिर्मितीस मान्यता
 
विधि व न्याय
सावनेर, जिल्हा नागपूर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्यास मान्यता
महसूल
वाळू/रेती उत्खननाबाबत नवीन एकत्रितरित्या सर्वकष सुधारीत धोरण लागू
जलसंपदा
१२ जलसंपदा प्रकल्पांना ११४ कोटी रुपयांऐवजी ६२४ कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चितीस मान्यता