रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (10:19 IST)

रेखा जरे हत्या : बाळ बोठेला मदत करणारे दोघे कोरोना पॉझिटिव्ह !

Rekha Jare
फरार असताना बाळ बोठेला मदत करणार्‍या दोघांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब अपुरे राहिले आहेत.दरम्यान मदत करणार्‍यांची आणखी चार नावे पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर शंभर दिवस पसार असलेल्या बोठेला पोलिसांनी हैदराबादेतून अटक केली.
 
पोलीस कोठडीत चौकशी पूर्ण झाली असून तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणार्‍यांची नावे पोलिसांनी धुंडाळून काढली आहेत. गत आठवड्यात पाच जणांची चौकशी करत पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले.
 
त्यातून आणखी चार नवीन नावे समोर आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तसेच दोन नामांकित व्यक्तींचा नव्या नावांमध्ये समावेश असल्याचे समजते.मदत करणार्‍यांची चौकशी सुरू असतानाच दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांचा अधुरा जबाब कोरोनामुक्त झाल्यानंतर घेतला जाईल असे तपासी अधिकारी पाटील यांनी सांगितले आहे.