शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (10:02 IST)

लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही' असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावरच्या पोस्टनंतर वाद निर्माण झाला

rupali chakarnkar
'लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही' असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यांच्या या पोस्टनंतर वाद निर्माण झाला होता.

चाकणकर यांच्या पोस्टवर अनेकांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेतही कमेंट्स केल्या होत्या. याची दखल घेत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याविरोधात फेसबुक पोस्ट लिहून रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
 
हेरबं कुलकर्णी यांनी यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात अशाप्रकारची भाषा वापरल्याप्रकरणी त्यांनी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.