Widgets Magazine

सदाभाउ खोत ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल

कृषी व पणन राज्यमंत्री यांना तातडीने ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पहाटे उलट्यांचा त्रास झाला आणि चक्करही आली होती, याशिवाय त्यांना मानदुखीचाही त्रास उद्भवला आहे. सदाभाऊ खोत यांची
प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
पणन मंडळातील आढावा बैठक व अन्य कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी ते रात्री पुण्यात आले. मात्र पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि चक्कर आली त्यानंतर त्यांना तातडीने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात
दाखल करण्यात आले.


यावर अधिक वाचा :