शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (08:52 IST)

कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना द्या, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर येऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. यावेळी राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासन आणि पालिकेतर्फे देखील महत्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत. 
 
स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.