शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (12:31 IST)

प्रेमासाठी नकार दिल्याने तो आत्महत्येसाठी मुलीला व्हिडीओ कॉल करत टेरेसवर चढला

प्रेमात नकार सहन होत नाही म्हणून लोक कोणतंही पाऊल उचलतात आणि कुटुंबाची काळजी न करत थेट स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार सांगलीत घडला आहे जिथे मैत्रिणीने प्रेमासाठी नकार दिल्यानं एका तरुणाने गजब ड्रामा केला. तो टेरसवर चढला आणि नकार देणाऱ्या मुलीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे संबंधित तरुणाचे प्राण वाचले आहेत.
 
ही घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आहे. तरुणाला पोलिसांनी वाचवल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
 
प्रेमात अपयश आल्यामुळे हा तरुण आपल्या राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जावून संरक्षक भिंतीवर चालत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता आणि नकार दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी देत होता. तरुणीने प्रेमसंबंधाला साफ नकार दिला आणि आपण मैत्री ठेवू असं सांगत होतं.
 
यावर तरुणानं आरडाओरडा करत थेट आत्महत्येची धमकी दिली. तो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून नकार देणाऱ्या तरुणीला भीती दाखवत होता तेव्हा काही स्थानिक तरुणांनी याची पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हा तरुण 20 वर्षांचा असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तसेच जवळच्या एका कॅफेत काम करतो. एकुलत्या एक मुलाच्या या कृत्यानं आई-वडिलांना देखील अश्रू अनावर झाले आणि प्राण वाचल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले.