1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (16:20 IST)

पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान

sanjeevan-samadhi-ceremony-started-in-pandharpur
आळंदी  येथे होत असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री. विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले. सकाळी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर  येथे श्री. विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यानंतर आळंदी येथे होत असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी सोहळ्यासाठी श्रीसंत नामदेव महाराज स्मारक येथून आकर्षक अशा फुलांनी सजविलेल्या एस. टी. बसमध्ये श्री. विठ्ठलाच्या पादुका ठेवून पादुकांचे आळंदीकडे प्रस्थान करण्यात आले.