गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (08:03 IST)

आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला,सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील सत्तासंघर्ष

dhananjay mahadik
“आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे महाभारत होणार आणि वाईटाचा नाश होणार, असा इशारा धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना दिला आहे. कोल्हापूरात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात महाडिकांनी हे वक्तव्य केलं आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील सत्तासंघर्ष चांगलेच तापले आहे.
 
गेल्या २० दशकापासून महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभा आणि गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांनाच यश मिळाले होते. धनंजय महाडिक यांची राजकीय कार्यकीर्द धोक्यात आली होती. महाडिकांच्या साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थावरही सतेज पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे कोल्हापुरचे राजकारण एकतर्फी असल्याचे चित्र वाटत असतानाच मध्यंतरीच राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयामुळे धनंजय महाडिकांचे राजकीय पुन्नर्वसन होण्यास मदत झाली.