गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (10:24 IST)

देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही - शरद पवार

मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार धक्का दिलाय. देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही त्यामुळं त्याचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. एका खासगी मराठी वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली आहे. यामुळे भविष्यात भाजपा विरोधात महाआघाडी होणार नाहीत अशी चिन्हे आहेत. राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नसेल याचेही स्पष्ट संकेत त्यांनी यातून दिले आहेत. त्यामुळे शरद पवार कोणता नवीन फासा टाकणार आहेत. हे पाहणे गरजेचे आहे. महाआघाडीची चर्चा वारंवार होत असते. महाआघाडी होणार असेल तर मी त्यात आड येणार नाही मात्र अशी शक्यता दिसत नाही. त्यापेक्षा निवडणूकीनंतर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आधीच आघाडी तय्यार करणे गरजेचे नाही, देशातील प्रत्येक प्रदेश तेथील स्थिती अगदी वेगळी आहे. त्यामुळे महाआघाडी करताना विचार करावा लागणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानणारे पक्ष एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही राज्यात करणार आहोत असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.