शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (21:08 IST)

नामांतराच्या विषयावर शरद पवारांनी 'असं' केलं भाष्य

renaming of aurangabad NCP president sharad pawar
औरंगाबादच्या नामांतरावरुनच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.शरद पवार यांनी सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”.
 
मुख्यमंत्री कार्यालयाच्या  ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता. त्यातच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे.